जेजुरी  (प्रतिनिधी)-आपल्या कणखर वाणीने राष्ट्रपुरुषांचा इतिहास जिवंत
करणारे जेजुरी येथील व्याख्याते व पत्रकार निलेश जगताप यांना नुकताच पारगाव
सालु मालू येथील शिलेदार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य , सालु-मालू मित्र मंडळ
पारगाव व एकता ग्रुप मित्र परिवार केडगाव यांच्या संयुक विद्यमाने दिला जाणारा
राज्यस्तरीय “शिलेदार वक्ता महाराष्ट्राचा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आले आहे.
         जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वसुधाताई सरदार यांच्या शुभहस्ते व माजी
जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.नामदेव बापू ताकवणे, कॉंग्रेस चे दौंड तालुकाध्यक्ष
पोपटभाई ताकवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी
पारगाव सोसायटीचे संचालक रमेश बोत्रे , प्रा.राजेंद्र शिशुपाल , पारगावचे
सरपंच दत्तात्रय कुंभार,उपसरपंच संभाजी ताकवणे,सयाजी ताकवणे, नानगावचे उपसरपंच
विकास रासकर,गलांडवाडी च्या सरपंच ज्योतीताई शितोळे,युवा नेते अतुल ताकवणे
,माऊली ससाणे,राजेंद्र खोमणे आदी उपस्थित होते.
       यावेळी पुरस्काराला उत्तर देताना निलेश जगताप म्हणाले की, सर्वप्रथम हा
पुरस्कार मी कोपर्डी येथील अत्याचाराला बळी पडलेल्या निर्भयाच्या स्मृतींना
समर्पित करीत असून हा  सन्मान माझा नसून माझ्या शब्दांचा सन्मान आहे. त्यामुळे
येणाऱ्या काळात शब्दांच शस्त्र हाती घेऊन कोपर्डी सारख्या घटना घडू नयेत या
साठी लढणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. आपल्या सर्वांचे प्रेम,
सहकार्य हीच माझी दौलत आहे असून आपले हे प्रेमळ सहकार्य नेहमीच माझ्या पाठीशी
राहू द्या. अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
        आपल्या व्याख्यानंमुळे राज्यभर प्रसिद्ध असणाऱ्या निलेश जगताप यांना
आजवर राज्यातील विविध संस्था व संघटनांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले
आहे. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सामाजिक ,राजकीय व विविध क्षेत्रातील
मान्यवरांनी  त्यांचे अभिंनंदन केले आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top