राजुरी (पुणे सुपरफास्ट न्युज) - 
                       श्री क्षेत्र जेजुरी येथे माही पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या शिखर काठयांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी संगमनेर येथून निघालेल्या मानाच्या "होलम "काठीचे आज पुणे जिल्ह्यात आगमन झाले .
            गेले अनेक वर्षापासून  माही पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या शिखर काठयांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी संगमनेर येथून निघालेल्या मानाच्या "होलम "काठीचे आज नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात आळेफाटा येथे फटक्याच्या आतीश्बाजित ढोल ताश्याच्या गजरात स्वागत केले हि होलम काठी आळे येथील आम्बिकामाता देवस्थान येथे पोहचल्यानंतर आळेफाटा व पंचक्रोशीतील अनेक गावांतील भाविक या होलम काठी व पालखीचे चे दर्शन घेण्यासाठी येतात .  
त्यानंतर या काठी पालखीची भंडारा व खोबरे यांची उधळण करत  "सदा आनंदाचा येळकोट" या जयघोषात आळे येथून जेजुरीकडे प्रस्थान होते .
(प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)
 
 



 
Top