नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्यूज) - 
             जागतिक पातळीवर तेलाच्या दरात घट होत असल्यामुळे तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 32 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 85 पैशांची कपात जाहीर केली. मध्यरात्रीपासून हे दर अमलात येतील. एक डिसेंबरपासूनची ही चौथी दरकपात आहे. नव्या दरानुसार दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 59 रुपये तीन पैसे आणि डिझेल प्रतिलिटर 44 रुपये 18 पैसे दराने उपलब्ध होईल. एक जानेवारीला पेट्रोलच्या दरात लिटरमागे 63 पैसे आणि डिझेलच्या दरात लिटरमागे एक रुपया सहा पैशांची कपात करण्यात आली होती. 


 
Top