मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
 
     बोरिवली स्थानकावरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने गुरूवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आज सकाळी ७.३०च्या सुमारास ही सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. पश्चिम रेल्वेमार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर या बिघाडाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान, गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना गैससोयीला सामोरे जावे लागत आहे.


 
Top