नागपूर (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
‘महाराष्ट्र केसरी’ची चांदीची गदा कोणाच्या खांद्यावर असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना दुसऱ्या फेरीत शेवटच्या ३० सेकंदांत जळगावच्या विजय चौधरीने मुंबईच्या विक्रांत जाधवला चीतपट केले आणि सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. सलग दुसऱ्या वर्षी हा मानाचा किताब पटकावणारा तो सहावा मल्ल ठरला आहे. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या निनादात विजयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चांदीची गदा आणि एक लाख रुपये पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कुस्ती चाहत्यांच्या मनात ही लढत चीतपट होण्याची इच्छा होती. अहमदनगरनंतर चीतपटचे क्षण पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा नागपुरात पूर्ण झाली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या चिटणीस पार्कच्या आखाडय़ात लाल पोशाख परिधान केलेला विक्रांत जाधव, तर निळा पोशाख परिधान केलेला विजय चौधरी उतरला. दोन्ही मल्ल एकमेकांसमोर आल्यानंतर कोण बाजी मारेल, अशी हजारो प्रेक्षकांना उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकांचे पट काढण्याचे प्रयत्न केले. पहिल्या फेरीत जाधव ० तर चौधरीला ३ गुण मिळाले होते. मात्र दुसऱ्या फेरीत विक्रांतने पलटी देत २ गुण मिळवले. २-३ अशी गुणसंख्या झाली असताना विजयने १ गुण मिळवला आणि त्याची गुणसंख्या ४ झाली. दुसऱ्या डावात ४-२ गुण विजयच्या बाजूने असताना विक्रांतने सालटो डाव मारण्याचा प्रयत्न केला. विजयने तो डाव उधळून लावत त्याला चीतपट केले. जिंकण्याचा आत्मविश्वास होता -विजय चौधरी ‘‘सलग दुसऱ्यांदा हा किताब मिळवू शकेन, हा आत्मविश्वास असल्यामुळे त्या पद्धतीने मी खेळलो. शिवाय माझ्या प्रशिक्षकांनी माझ्याकडून तशी मेहनत करून घेतली होती. आपल्यापुढे प्रतिस्पर्धी कोण आहे, त्याचे डावपेच बघितल्यानंतर त्या पद्धतीने माझे प्रशिक्षक माझ्याकडून सराव करून घेत होते आणि त्याचा मला फायदा झाला,’’ असे विजय चौधरीने सांगितले. माती विभागात कुस्ती खेळल्यानंतर गादीवर कुस्ती खेळताना दोन्ही ठिकाणची खेळण्याच्या पद्धतीमध्ये काही फरक पडतो का, असे विचारले असता विजय म्हणाला, ‘‘ मुख्यमंत्र्यांनी पोलिसात शिपाई म्हणून नोकरी न देता चांगले पद देऊन सन्मान केला पाहिजे. आता रुस्तम-ए-हिंद केसरीची तयारी करणार असून ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या दिवसात तयारी करणार आहे.