मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
           भायखळा-सँडहर्स्टरोड या स्थानकांदरम्यान ऐतिहासिक हँकॉक पुलाला आज, रविवारी अखेरचा निरोप देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे तब्बल १८ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान भायखळ्यापुढे एकही गाडी जाणार नसल्याने मध्य रेल्वेमार्गे मुंबईकरांचा मुख्य मुंबईशी असलेला संपर्क तुटणार आहे. पण मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी बेस्टने काही विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्बरवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. परिणामी मुख्य मार्गावरून कुर्ला येथे उतरून त्यानंतर हार्बर मार्गाने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचण्याचा पर्याय प्रवाशांकडे उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल, वाशी या दिशेला जाणाऱ्या गाडय़ांची संख्याही इतर रविवारच्या तुलनेत जादा असेल. हार्बर मार्गाशिवाय दादर स्थानकात उतरून पश्चिम रेल्वेमार्गेही चर्चगेटपर्यंत येणे प्रवाशांना शक्य होणार आहे.



 
Top