पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
"शेतकऱ्यांच्या बहात्तर रोगांचे मूळ म्हणजे शेतमालाला रास्त भाव‘ हे सूत्र घेऊन लाखो शेतकऱ्यांची संघटना बांधून त्यांच्यासाठी आवाज उठविणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार आणि ज्येष्ठ विचारवंत शरद जोशी (वय ८१ ) यांचे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येत्या मंगळवारी (ता. १५) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जोशी यांना दोन मुली असून त्यापैकी श्रेया शहाणे या कॅनडात, तर डॉ. गौरी जोशी या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहतात. निधनाचे वृत्त समजल्यानंतर, त्या दोघी आज तेथून निघाल्या असून, उद्या पुण्यात पोहोचतील. भारतीय टपाल सेवेत, तसेच परदेशात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर जोशी यांनी १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचे मोठे संघटन राज्यात, तसेच देशात उभे राहिले. शेतीमालाला रास्त भाव मिळावा, या संदर्भात त्यांच्या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फुटली. त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. राज्यसभेचे खासदार, केंद्र सरकारच्या कृषीविषयक कार्यबल या संस्थेचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून त्यांनी काम पाहिले.
जोशी यांना मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागल्याने, त्यांना गेल्या तीन नोव्हेंबरला रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या वेळी केलेल्या तपासणीत त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथींना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेथे महिनाभर उपचार केल्यानंतर, त्यांना एक डिसेंबरला बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. काल रात्री त्यांनी जेवण घेतले नाही. सकाळी त्यांनी चहा घेतला होता. कालपासूनच त्यांचे बोलणेही थांबले. आज सकाळी नऊच्या सुमाराला त्यांचे निधन झाले. जोशी रुग्णालयात असताना त्यांच्या मुली त्यांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. काही दिवस थांबून त्या पुन्हा घरी परत गेल्या.