घाटकोपर (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
घाटकोपर मेट्रो स्थानकात एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्थानकावरील स्वच्छता गृहात जाऊन या तरुणाने विषप्राशन केले. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. मेट्रो स्थानकावर काम करणा-या कर्मचा-यांना स्वच्छतागृहामध्ये ही तरुणी विषप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आली.
त्यांनी तात्काळ मेट्रोच्या अधिका-यांना या घटनेची माहिती दिली. या तरुणीला नजीकच्या राजवाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या तरुणीचे नाव आणि आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही.