मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
पश्चिम रेल्वेच्या कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडीमुळे चर्चगेटच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू आहे. मुंबईकरांच्या ‘लाईफलाईन’चे ऐन गर्दीच्या वेळी रडगाणे सुरू झाल्याने चाकरमान्यांना प्रवासात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, तासाभरात लोकल सेवा पुन्हा सुरळीत होईल असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.




 
Top