नवी दिल्ली (पुणे
सुपरफास्ट न्यूज) -
भारतीय रेल्वेने
नाताळच्या मुहुर्तावर तत्काळ श्रेणीतील तिकीटांच्या दरात बदल केले आहेत.
उद्यापासून (शुक्रवार) प्रवाशांना विविध श्रेणीतील तिकीटांसाठी 10 ते 100 रूपयांपर्यंत
अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
स्लिपर क्लास तिकीटांचे तत्काळ आरक्षण
करण्यासाठी किमान 100 रूपये तर कमाल 200
रूपये मोजावे लागणार आहेत. एसी पॅसेंजर तिकीटांसाठी किमान 125
रूपये तर कमाल 225 रूपये मोजावे लागणार आहेत.
त्याचप्रमाणे एसी-3 टायरच्या तिकीटांसाठी कमीत कमी 300
तर जास्तीत जास्त 400 रूपये मोजावे लागणार
आहेत. एग्झिक्युटिव्ह क्लाससाठी किमान 400 रूपये तर कमाल 500
रूपये भरावे लागणार आहेत.
तत्काळमध्ये तिकीट आरक्षित करण्यासाठी
केवळ एसी तिकीटांचे दर वाढवण्यात आले असून सेकंड क्लास श्रेणीतील तिकीटांचे दर
कायम ठेवण्यात आले आहेत.
