राजेवाडी मंडलचे शासन आपल्या दारी माळशिरस
पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुरंदर तालुक्यातील सर्वच विभागाचे तालुका अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी थांबुन सामान्य शेतक-यांची कामे करणार आहेत. तालुका ठिकाणी न येता याच ठिकाणी विविध धाकले, कागतपत्र, अडीअडचणी सोडण्यात येणार आहे.यासाठी सर्वांनी विस्तारीत समाधान योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन पुरंदर व दौंड तालुक्याचे प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी केले आहे.ते महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभाग महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान योजना शासन आपल्या दारी मंडल भाग राजेवाडी यांच्या वतीने माळशिरस येथील सुर्या लाँन्स मंगल कार्यालयात ते बोलत होते. शिवसेनेचे तालुका प्रमख दिलीप यादव ,पुणे जिल्हा परीषदेच्या कृषि व पशु संवर्धन सभापती सारीका इंगळे, माजी जिल्हा परीषद सदस्य सुदाम इंगळे, प्रांत अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील,पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जितेंद्र बि रुड ,पुरंदर कृषि अधिकारी देवेंद्र ढगे, पुरंदर तालुका वैद्यकिय अधिकारी चव्हाण,बँक आँफ बडोदा माळशिरसचे व्यवस्थापक राजेश्वर राव, पुरंदर तालुका वन विभागाचे दोरगे, माळशिरसच्या सरपंच सुरेखा यादव, उपसरपंच काकासो यादव,गु-होळीचे सरपंच रामचंद्र खेडेकर, पोंढेच्या सरपंच विजया जाधव,श्री भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव,सुनिल यादव, माजी सरपंच बाळासो यादव, सदाशिव डोंबाळे, माऊली यादव, परीसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. गु-होळीचे सरपंच रामचंद्र खेडेकर म्हणाले कि राजेवाडी विभागातील दहा गावात पावसाचे प्रणाम कमी आहे.यामुळे दुष्काळ ग्रस्त गावे जाहीर करावी, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे बिल शेतक-यांना परवडत नाही त्यात सवलत मिळावी.माऊली यादव यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचे नियोजन होत नाही ते सुरळीत करणे, योजनेचे विजबील कमी करणे, रस्त्यावरील खांब बाजुला घेणे, शाळेजवळील ट्रान्सफार्मर यांना तार कंपाऊंड बसवणे इत्यादी मागणी केली.
यावेळी विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी,पुरवठा विभाग,महा ई सेवा केंद्र वाघापुर यांच्या वतीने प्रतिन्या पञ देण्यात आले. संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ, इंदीरा गांधी राष्ट्रीय योजना,विधवा, अपंग, आम आदमी विमा,पँनकार्ड, एकात्मीक बालविकास सेवा योजने अंतर्गत सात्विक आहार, बँक आँफ बडोदा माळशिरस शाखेच्या वतीने बचत खाते उघडणे,
सर्वच पदाधिका-यांनी सर्वच विभागाची पहाणी केली. कार्यक्रमाचे सुञसंचालन श्वेतांबरी घोगरे तर आभार श्री भुलेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव यांनी मानले. ( प्रतिनिधी - अक्षय चाचर )
