जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -   जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागाची परिस्थिती मागील काही वर्षापासून हालाकीची आहे. स्वतःला आदिवासींचे तारणहार मानणारे आदिवासींचे नेते फक्त निवडणुकीसाठी आणि मतांच्या राजकारणासाठी आदिवासी जनतेकडे पाहत आहे. एकदा का निवडणुकीत झाली ति जिल्हापरिषद असो वा विधानसभा कोणताच आदिवासी नेता आदिवासींच्या समस्येकडे लक्ष देत नाही. आदिवासी समाजासाठी असेलेला करोडो रू.चा निधी आजही गरजू आदिवासी जनतेपर्यंत पोहचत नाही.
    नुकताच एक अनुभव आला की आदिवासी समाजाने आपल्या श्रषिकेश बहुउद्देशिय विकास संस्थे मार्फत चावंड येथे कार्यक्रम आणि उदघाटन आयोजित केले होते.मात्र सर्व  नेत्यांना आमंत्रण असूनही केवळ आमदार शरददादा सोनवणे यांचे बंधू शशीभाऊ सोनवणे,शिवसेनेचे जि.प.सदस्य विश्वास आमले,पंचायत समिती सदस्य पंडीत  मेमाणे,मनसेचे तालुकाध्याक्ष दत्ता शिदे,निलेश चव्हाण,राजु डुंबरे,विकास सोनवणेआणि निखिल घोगरे इ.मान्यवर उपस्थित होते.
      आता गरज आहे ती आदिवासी जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याची यासाठी आदिवासी जनतेने योग्य नेत्याची निवड करून आपला विकास साधला पाहिजे हिच अपेक्षा
 
Top